महाराष्ट्र

मिलिंद देवरा १० माजी नगरसेवकांसह शिंदे गटात

मिलिंद देवरा १० माजी नगरसेवकांसह शिंदे गटात
मिलिंद देवरा १० माजी नगरसेवकांसह शिंदे गटात फोटो: ठाणे वैभव
मुंबई : आगामी लोकसभेसाठी दक्षिण मुंबईवर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आल्यानंतर 'माजी'च राहण्याच्या शक्यतेनं नाराज झालेल्या माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अखेर राजकीय देवारा बदलला आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री राहिलेल्या देवरा यांनी 10 माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी देवरांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी शिंदे गटातील अनेक नेते देवरांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी देवरांसोबत 10 माजी नगरसेवकांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला. देवरा यांच्या पक्षप्रवेशाने शिंदे गटाला दिल्लीमध्ये चेहरा मिळाला आहे. त्यांच्या प्रवेशासाठी खासदार श्रीकांत शिंदे आग्रही होते, अशी माहिती आहे. पक्षप्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटावर कडाडून हल्लाबोल केला. यावेळी ते बोलताना म्हणाले की, मी पक्षाच्या आव्हानात्मक काळात काँग्रेससोबत होतो. माझ्या वडिलांच्या काळातील काँग्रेस आणि आजच्या काँग्रेसमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. जर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक, मेरिट आधारित राजकारण केले असते तर एकनाथ शिंदे आणि मला आज इथे येऊन बसावे लागले नसते. ते पुढे म्हणाले की, आजच्या काँग्रेसला मोदींना विरोध एवढच आजच्या काँग्रेसला माहिती आहे. मी पक्ष सोडेन असे कधीच वाटले नव्हते, पण आज माझ्या कुटुंबाचे काँग्रेससोबतचे 55 वर्षांचे नाते मी तोडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्हिजन मोठे आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचेही देशासाठीचे व्हिजन मोठे आहे. यांचे हात मला बळकट करायचे आहेत. बाळासाहेब माझे वडिल मुरली देवरांना महाराष्ट्राचे जावई म्हणायचे. माझ्यावर चुकीचा आरोप होण्याआधी एकनाथ शिंदेंनी मला प्रवेशाचे आमंत्रण दिले. खासदार होऊन मी मुंबई आणि महाराष्ट्राचा चांगला विकास करु शकतो. देवरांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तोफ डागली. ते म्हणाले की, एक, अभ्यासू संयमी नेता मिळाला आहे. हा ट्रेलर असून पिक्चर आणखी बाकी आहे. मी, सकाळी उठून रस्ते धुण्याचे काम करतो, त्यामुळे चहल सुद्धा हातात झाडू घेतो आणि आमदार सुद्धा घेतात. मी दीड वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. गावी जाऊन सुद्धा काम करतो. मी शेतात जातो काम करतो जनता दरबार घेतो. वेळ कमी असल्यामुळे मी हेलिकॉप्टरमधून जातो आणि वेळ वाचवतो. मी हेलिकॉप्टरमधून फोटो काढत नाही. काही लोक काल कल्याण लोकसभेत गेले होते. आता निवडणुकीत यांना साफ करा म्हणाले. लोक लोकांची कामे करणाऱ्याला कसे साफ करतील? घरात बसणाऱ्याला साफ करतील. राज्य महिला आयोग माजी अध्यक्ष सुशिबेन शहा, माजी नगरसेवक प्रमोद मांद्रेकर, सुनिल नरसाळे, रामवचन मुराई, हंसा मारु, अनिता यादव, रमेश यादव, गजेंद्र लष्करी तसेच मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रकाश राऊत, मारवाडी संमेलन अध्यक्ष सुशिल व्यास, पुनम कनोजिया डायमंड मर्चंट, जैन सेवा संघ अध्यक्ष संजय शहा, मुंबई काॅग्रेस राजस्थानी सेल अध्यक्ष दिलीप साकेरिया, निवृत्त पोलिस अधिकारी हेमंत बावधनकर, विश्वस्त सिद्धीविनायक मंदीर, मुंबई काँग्रेस सचिव राजाराम देशमुख आदींनी शिंदे गटात प्रवेश केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475