जिल्हा

ठाण्यात दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

ठाण्यात दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
ठाण्यात दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव फोटो: ठाणे वैभव
स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचा कार्यक्रम
ठाणे: स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) यांच्या वतीने राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच 'जेनेरिक आधार'चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना करिअर, उद्योजकता, नवकल्पना आणि यशस्वी भविष्यासंदर्भात प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या सोहळ्याला ठाणे शहरासह परिसरातील हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या सोहळ्यात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमादरम्यान लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आठ लॅपटॉप आणि १६ टॅबलेट बक्षीस स्वरूपात वितरित करण्यात आले. तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475