जिल्हा
उद्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
उद्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : येत्या रविवारी, २६ मार्च २३ रोजी देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वे आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.
ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगा ब्लॉक राहील. छशिमट मुंबई येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ या वेळेत सुटणा-या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
कल्याणहून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणा-या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांच्या दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असेल. छशिमट मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सुटणा-या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेलहून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ पर्यंत छशिमट मुंबईकडे जाणा-या अप हार्बर सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छशिमट- कुर्ला आणि वाशी - पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बरमार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475