महाराष्ट्र
मनोज जरांगे पाटील यांचे दुसरे उपोषण मागे
मनोज जरांगे पाटील यांचे दुसरे उपोषण मागे
फोटो: ठाणे वैभव
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले उपोषण मनोज जरांगे यांनी मागे घेतले असून सरकारला २ जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटीत जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रदीर्घ चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेतल्याची भूमिका घेतली.
२४ डिसेंबरनंतर सरकारला एकही दिवस वाढवून न देण्यास जरांगे पाटलांनी विरोध केला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत वेळ देण्याची विनंती मनोज जरांगे यांना केली. पण जरांगे पाटील २४ डिसेंबर या तारखेवर ठाम राहिले. त्यानंतर तारखेबाबत बराच वेळ चर्चा देखील करण्यात आली. अखेर त्यांनी दोन महिन्यांची मुदत देत असल्याचे म्हटले आहे. तसेच २ जानेवारीनंतर मुंबईचे नाक बंद करु असा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात गेले होते त्यावेळी शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी ८ डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचंही आश्वासन दिले.
जरांगे पाटलांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणानंतर राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण आल्याचे पाहायला मिळाले, त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सरकारचे शिष्टमंडळ हे जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी अंतरवली सराटीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करुन त्यांचे उपोषण सोडले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475