मनोरंजन

झी चित्र गौरव पुरस्कार २०२४ च्या मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार !

झी चित्र गौरव पुरस्कार २०२४ च्या मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार !
झी चित्र गौरव पुरस्कार २०२४ च्या मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार ! फोटो: ठाणे वैभव

अवधूत गुप्तेंच्या प्रश्नांना कसे सामोरे गेले अजित दादा

मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी गौरव पुरस्कार २०२४’ हा सोहळा मोठ्या दिमाखदार आणि धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या 'झी चित्रगौरव पुरस्कार २०२४' सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार साहेब.

ह्या पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित दादा अवधूत गुप्तेंनी विचारलेल्या प्रश्नांना सामोरे गेले आणि अतिशय खुमासदारपणे आणि मनोरंजकपणे त्यांचा सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. या कार्यक्रमात अजित दादांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी ही ताज्या केल्या 'मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण कॉलजच्या काळात मला अमिताभ बच्चन आवडायचे, नंतरच्या काळात शाहरुख खान आला, त्यामुळे वयानुसार आवड असते, असंही अजित पवार म्हणाले. जर तुमच्यावर बायोपिक करायचा म्हटलं तर कोणी अभिनय करावा? असा प्रश्न विचारल्यावर अजितदादांनी डॉक्टर निलेश साबळे यांचं नाव घेतंल. त्यावेळी साबळेंनी अजितदादांची मिमिक्री देखील करून दाखवली.

कार्यक्रमात एक गेम खेळत असताना अवधुत गुप्ते यांनी 'थंड बर्फ कोणाला द्यावा? जेणेकरून डोक्यावर ठेऊन डोकं शांत केलं जाईल', असा सवाल विचारला तेव्हा दादांनी पार्थ पवार यांच नाव घेतलं. अजून काय काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार. यासाठी पाहायला विसरू नका 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२४' शनिवार १६ मार्च संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475