जिल्हा

८२व्या वर्षी इतिहास विषयातून प्रथमश्रेणीत एमए

८२व्या वर्षी इतिहास विषयातून प्रथमश्रेणीत एमए
८२व्या वर्षी इतिहास विषयातून प्रथमश्रेणीत एमए फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: वयाच्या 82 व्या वर्षी महेश गुप्ते यांनी इतिहास विषयातून एमएची प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण होण्याची किमया साधली आहे. ठाण्याच्या व्यास क्रिएशनच्या माध्यमातून ऐतिहासिक विषयावर विपुल लिखाण करणाऱ्या महेश गुप्ते यांना इतिहास विषयाची प्रथमपासून आवड आहे. जुनी नाणी जमवण्याचा त्यांचा आवडता छंद असून 1835 पासूनची सर्व जुनी नाणी आणि 17 व्या शतकापासूनची काही निवडक नाणी त्यांच्या संग्रहात आहेत. याशिवाय गुप्ते यांची 19 ऐतिहासिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील शिक्केकट्यारी या पहिल्या पुस्तकाला कोकण इतिहास परिषदेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद पुस्तकाला लाभला आहे. तब्बल 10 देशांची भ्रमंती त्यांनी केली आहे. इतिहास विषय घेऊन श्री. गुप्ते यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून इतिहास विषयात 550 पैकी 330 गुण प्राप्त करून प्रथम श्रेणी पटकावली आहे. श्री. गुप्ते यांनी बीए जीसीडीपर्यंत शिक्षण घेतले आहे. अंबरनाथ येथील धरमसी मोरारजी या कंपनीत त्यांनी 31 वर्षे नोकरी केली होती.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475