जिल्हा

लोकलचा डबा घसरला; रेल्वे वाहतूक विस्कळीत

लोकलचा डबा घसरला; रेल्वे वाहतूक विस्कळीत
लोकलचा डबा घसरला; रेल्वे वाहतूक विस्कळीत फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : मध्य रेल्वेचे गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली स्थानकात सोमवारी सकाळी फलाट क्रमांक एक वर लोकलचा डबा रुळावरून घसरला. परिणामी मुंबईकडे व कल्याणकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ पावले उचलून सुमारे ६० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने लोकल ट्रेन पुन्हा रुळावर आणण्यात यश मिळवले. कोपर ते कल्याण दरम्यान ठप्प झालेली लोकल सेवा सकाळी १०:४५ वाजल्यापासून पुन्हा सुरू करण्यात आली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या घटनेमुळे नोकरी धंद्यानिमित्त कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान काही लोकल गाड्या रद्द झाल्याने स्थानकात तोबा गर्दी झाली होती. सोमवारी सकाळी डोंबिवली स्थानकात रेल्वे फलाट क्रमांक एक वर कळवा कारशेडमधून आलेली रिकामी लोकल रेल्वे ट्रॅकवरून घसरली. ट्रेन रिकामी असल्याने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र यामुळे इतर लोकल ट्रेनचा खोळंबा झाला. काही काळ रेल्वेसेवा कोलमडून पडली आणि स्थानकात गर्दी झाली. मात्र फास्ट ट्रॅकवरील रेल्वे वाहतूक सुरळीत होती. स्थानकात लोकल घसरल्याने काही नागरिकांनी कल्याण व दिवा येथे ज्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून रिक्षाने जाण्याचे ठरवले. मात्र पूर्व व पश्चिम विभागातील रिक्षा चालकांनी इच्छुक प्रवाशांना दाद दिली नाही. रिक्षा चालक उडवाउडवीची उत्तरे देत होते, अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिकांचे खूप हाल झाले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475