जिल्हा
ठाण्याच्या पलिकडच्या लोकल जलद गाड्या मुलुंडहून पुन्हा वळवणार
ठाण्याच्या पलिकडच्या लोकल जलद गाड्या मुलुंडहून पुन्हा वळवणार
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग 10 नोव्हेंबर 24 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक करणार आहे.
सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गांवर ब्लॉक होणार आहे.
छशिमट मुंबईहून सकाळी 10.25 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणा-या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार माटुंगा थांब्यावर डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
ठाण्याच्या पलीकडे असलेल्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन फास्ट मार्गावरून पुन्हा वळवण्यात येतील. सकाळी 10.50 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणा-या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांच्या दरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि पोहोचतील. गंतव्य नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशीरा पोहचतील.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475