जिल्हा

डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर हल्ला

डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर हल्ला
डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर हल्ला फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली: शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवत एका लहान मुलीला खेचत नेत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. यावेळी एक इसम मदतीला धावला आणि त्याने भटक्या कुत्र्यांपासून लहान मुलीची सुटका केली. ही घटना मंगळवारी 24 तारखेला सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव रेती बंदर रोडवरील शिव मंदिरजवळ घडली. ही घटना जवळील एका घराबाहेरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डोंबिवली व ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांनी आता थेट टोळी बनवत माणसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. एकटा माणूस दिसला की भटके कुत्रे त्यांच्या अंगावर धावून जातात. त्याच्यावर हल्ला करत चावा घेत असल्याने घाबरलेला तो माणूस आरडाओरड करतो. अशावेळी जवळील लोक त्याच्या मदतीला धावत त्याची कुत्र्यांपासून सुटका करतात. अशीच एक घटना डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गावात घडली. कुत्र्यांच्या टोळीने एका लहान मुलीवर हल्ला करत तिला खेचून नेत असताना एका इसमाने तिला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले, त्यामुळे तिचा जीव वाचला. ही घटना जवळील एका घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475