महाराष्ट्र

विधानपरिषद सभापती : भाजपकडून राम शिंदे

विधानपरिषद सभापती : भाजपकडून राम शिंदे
विधानपरिषद सभापती : भाजपकडून राम शिंदे फोटो: ठाणे वैभव
नागपूर : शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे यांनाच पुन्हा सभापतीपदाची संधी मिळेल, असा विश्वास शिवसेना नेत्यांना आहे. मात्र, भाजपकडून राम शिंदे यांना संधी देण्यात येणार असल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राम शिंदे हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाले आहेत. फडणवीस सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या रणधुमाळीत सध्या विधान परिषदेच्या सभापती निवडीची लगबग पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आता विधानपरिषद सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वानाच आहे. सध्या राज सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यातच विधानपरिषदेच्या सभापतीच्या निवडीचा मुहूर्त पार पडणार आहे. सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. तर, सभापती पद रिक्त आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या सभापतींची देखील लवकरच निवड केली जाणार आहे. भाजपकडून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. विधानपरिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे, भाजपकडून उद्या सकाळी राम शिंदे अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे, भाजपकडून राम शिंदे यांचं पुनर्वसन करण्यात येत असल्याचे दिसून येते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475