जिल्हा

पोषण आहारामध्ये आढळल्या अळ्या आणि बुरशी

पोषण आहारामध्ये आढळल्या अळ्या आणि बुरशी
पोषण आहारामध्ये आढळल्या अळ्या आणि बुरशी फोटो: ठाणे वैभव
पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये बुरशी आणि अळ्या आढळून आल्या आहेत. या प्रकारामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार तक्रार करूनही या प्रकरणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही पालकांनी यावेळी केला. पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो. मात्र शालेय विद्यार्थ्यांना शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये दोन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून या संपूर्ण घटनेमुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे उघड झाले आहे. पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या आनंद लक्ष्मण चांदावर विद्यालय खानिवली आणि चिंचणी जिल्हा परिषद शाळा तीन येथे पुरवण्यात आलेल्या पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या आढळून आल्या आहेत. या शाळांमध्ये देण्यात आलेल्या चिक्कीवर जिवंत अळ्या आणि बुरशी असल्याचे आढळून आले. या संपूर्ण धक्कादायक प्रकारामुळे एकाच खळबळ उडाली आहे. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना पोषण आहार पुरवण्याचा ठेका में. इंडो अलाइड प्रोटीन फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरवण्यात आलेल्या पोषण आहारात अळ्या आणि बुरशी आढळून आल्याने पोषण आहाराच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा निकृष्ट असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी देखील करण्यात आल्या आहेत, मात्र जिल्हा परिषद प्रशासन या प्रकारकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475