जिल्हा

कोपरीकरांची महिनाभर कोंडी

कोपरीकरांची महिनाभर कोंडी
कोपरीकरांची महिनाभर कोंडी फोटो: ठाणे वैभव
नवीन कोपरी रेल्वे पुलाचे होणार खोदकाम, डांबरीकरण ठाणे : ठाणे वाहतूक विभागांतर्गत कोपरी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत एमएमआरडीएतर्फे जुना कोपरी रेल्वे पूल ते भास्कर कट येथे नवीन सब वे आणि भास्कर कट ते कोपरी पुलाच्या सुरुवातीस खोदकामांचे काम बुधवारी सायंकाळी सुरु झाले आहे. पुढील महिनाभर या कामामुळे कोपरीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. काम सुरू झाल्यानंतर वाहनगर्दींचे नियोजन करण्यासाठी फक्त दोन वाहतूक पोलिसांवर आणि एकट्या टॅफिक वॉर्डनवर जबाबदारी आली. तरीही त्यांनी ती रात्री उशिरापर्यंत पेलली. ही कोंडी किमान २६ एप्रिल २३ ते २७ मे २३ पर्यंत, एक महिने होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. चार ठिकाणच्या रस्त्यांवर सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. बुधवारी सायंंकाळपासून वाहतूक बंद केल्यामुळे कोपरी सर्कलमध्ये एकाचवेळी असंख्य विविध वाहने रस्त्यावर आल्यामुळे एक वाहतूक पोलीस, एक महिला पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डनची धावपळ उडाली तर बेशिस्त चालकांचे फोफावले. या परिसरात आणि कोपरी सर्कल येथील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळवणे आवश्यक आहे. त्यासाठी आनंदनगर चेकनाकाकडून फॉरेस्ट नाका-कोपरी सर्कल जुनाा कोपरी रेल्वे पूलमार्गे, भास्कर कटकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना जुना कोपरी रेल्वे पुलाच्या सुरुवातीस प्रवेश बंद बुधवारी सायंकाळी करण्यात आला. कोपरी गाव सिद्धार्थनगरकडून जुना कोपरी रेल्वे पुलामार्गे भास्कर कटकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांनाही जुन्या कोपरी रेल्वे पुलाच्या प्रारंभी प्रवेश बंद केला. तीन हात नाका मुख्य रस्त्याने गुरुग्वारामार्गे कोपरी सर्कलकडे जाणा-या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. तीन हात नाका सर्व्हिस रोडमार्गे रघुवीर हॉटेलकडून कोपरी सर्कलकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना तुळजाभवानी मंदिर येथेही प्रवेश बंद करण्यात आला त्यांना सुचिता सोसायटीकडून डाव्या बाजुने वळण देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475