जिल्हा

बालविद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे

बालविद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे
बालविद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे फोटो: ठाणे वैभव
ठाण्यात योग दिन साजरा ठाणे : आरोग्याचा समतोल राखण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योगा करणे महत्वाचे आहे. या योगाचे महत्व जनमानसापर्यंत पोहचवण्यासाठी आज ठाण्यात मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. निमित्त होते ते २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे. सरस्वती मंदिर ट्रस्टच्या सरस्वती इंग्रजी माध्यम व घंटाळी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी 20 जून रोजी हा योग दिन साजरा करण्यात आला. नौपाड्यातील सहयोग मंदिर हॉल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी सरस्वती शाळेचे व्यवस्थापक सुरेंद्र दिघे, योग प्रशिक्षक हर्षदा मुजुमदार, अध्यक्ष सुजाता भिडे, विजया गवाले, बेला चौकसी, संध्या गणू, आदी यांच्यासह इतर शाळेतील शिक्षक उपस्थित होते. मुलांवर योग संस्कार चांगल्या रीतीने व्हावेत म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला घंटाळी मित्र मंडळाचे उत्तम सहकार्य लाभले. या मंडळाने १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना मार्गदर्शन केले. भावी पिढी घडवण्यासाठी ठाणे शहराला असे उपक्रम आयोजित करण्याची गरज आहे. घंटाळी मित्र मंडळाच्या सहकार्याने सरस्वती स्कूल हा उपक्रम भविष्यात देखील राबवत राहणार असल्याचे सुरेंद्र दिघे यांनी सांगितले. घंटाळी मित्र मंडळ हे गेल्या ११ वर्षापासून ठाण्यासह इतर शहरातील शाळा, कंपन्यांमध्ये प्रशिक्षण शिबिर घेऊन योगाचे महत्व निःशुल्क समजावत असते. या मंडळाची स्थापना 1965 मध्ये संस्थापक गुरुवर्य श्रीकृष्ण व्यवहारे यांनी केली. यांच्या हस्ते झाली आहे. योगामुळे जीवनात व्यक्तिमत्व विकास, स्वास्थ सुधारते, विचारधारा सुधारते, अध्यात्मिक कल वाढतो, शरीर, मन, चित्त, भावना यांचे नियंत्रण करता येते. या सर्वांमुळे एक सकारात्मक व्यक्तिमत्व निर्माण होत असते, असे अध्यक्ष सुजाता भिडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475