महाराष्ट्र

दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या: महाविकास आघाडीची बॅनरबाजी

दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या: महाविकास आघाडीची बॅनरबाजी
दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या: महाविकास आघाडीची बॅनरबाजी फोटो: ठाणे वैभव
ठाणे : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर ठाण्यात महाविकास आघाडीच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली, आणि लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली अशा आशयाचे बॅनर ठाण्यात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या आमदारांच्या पात्र-अपात्र संदर्भातील निकाल बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. या निकालापूर्वी दोन्ही गटात वातावरण चांगलेच तापले होते. मात्र कोणत्याच गटाचे आमदार अपात्र न करता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आहे तीच खरी शिवसेना असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेत आनंदाचे वातारण आहे. या निकालानंतर ठाण्यात ठिकठिकाणी जल्लोष देखील करण्यात आला. मात्र या निकालानंतर महाविकास आघाडीच्या वतीने ठाण्यात ठिकठिकाणी निषेधाचे बॅनर लावण्यात आले असून यामध्ये लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या झाली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शहरातील मुख्य चौकात हे बॅनर झळकत आहेत. ‘आज दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली, आणि लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली..’ ‘अब न्याय जनता करेगी…’ असा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला आहे. हे बॅनर ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनर वरून ठाण्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475