जिल्हा

कल्याणच्या चिमुकल्यांनी सर केला अतिकठिण श्री मलंगगड

कल्याणच्या चिमुकल्यांनी सर केला अतिकठिण श्री मलंगगड
कल्याणच्या चिमुकल्यांनी सर केला अतिकठिण श्री मलंगगड फोटो: ठाणे वैभव
कल्याण : अतिकठिण मानला जाणारा श्री मलंगगड कल्याणच्या चार वर्षीय श्राव्या भोसले, साक्षी हिप्परकर, आठ वर्षीय सृजन धर्माधिकारी, १० वर्षीय ईशान पासवान, नंदिनी थोपटे या चिमुकल्यांनी सर केला आहे. कल्याणचा श्री मलंगगड म्हणजे माथेरान डोंगर रांगेत उभा असलेला सुमारे ३,२०० फूट उंच असलेला टेहळणी कडा आहे. शिलाहार राजाने निर्माण केलेला हा तत्कालीन कालखंडात फक्त आजूबाजूच्या परिसरावर लक्ष देण्यासाठी बनवला होता. कल्याणच्या दक्षिणेपासून अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर हा गड आहे. पनवेल-वावंजे गावापासून हा किल्ला दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे. बदलापूरच्या नैऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा, उरणच्या नैऋत्येस आणि बोरघाट, भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा किल्ला होता. श्री मलंगड म्हंटल तर माथा गाठण्यासाठी करावी लागते ती अगणिक मेहनती सुमारे दोन तासांची चढाई त्यात गरज लागते ती भयावर मात करण्यासाठी मानसिक तयारीची. कारण गडाचा माथा गाठण्यासाठी हजारो फुटांवर असलेल्या अगदी एकच पाय ठेवता येईल एवढीच वाट. चुकीला माफी नाही अशा अर्थानेच श्री मलंगड उभा असावा कारण किंचितही पाय निसटला तर भीती असते हजारो फूट खोल दरीत कोसळण्याची. असा हा कठीण गड या चिमुकल्यांनी सर केला असून सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाच्या वतीने दर्शन देशमुख, रणजित भोसले, पवन घुगे, भूषण पवार, सुनील खणसे, संजय कारे, प्रशिल अंबादे, अभिषेक गोरे आणि सुहास जाधव यांनी तांत्रिक सहकार्य आणि मानसिक सहकार्य करून मोहीम यशस्वी करून दाखवली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475