जिल्हा
कळवा पूर्वेत गुंडावर गोळीबार
कळवा पूर्वेत गुंडावर गोळीबार
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संदीप पुजारी या गुंडावर त्याचाच साथीदार असलेल्या गुंडाने कळवा पूर्व शिवाजी नगरमध्ये गावठी बनावटीच्या पिस्तुलने गोळी झाडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी शनिवारी रात्री भास्कर नगर परिसरात या परिसरातील एका गुंडाने आपल्या परिसरातील एका तरुणाबरोबर झालेल्या वादातून त्याच्यावर वार केले होते. त्यामध्ये त्या गुंडासह 13 जणांविरोधात कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यातील चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
दरम्यान सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संदीप पुजारी याच्यावर हद्दीवरून मिळणाऱ्या हप्तेबाजीतून उल्हानगरमधील एका गुंड टोळीतील सराईत गुंड राहुल भोसले याने गावठी पिस्तूलने गोळी झाडून प्राणघातक हल्ला केला. ही गोळी संदीपच्या मांडीत घुसल्याने तो झाला होता. पुढील उपचारासाठी त्याला कळवा पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या घटनेप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475