महाराष्ट्र

कडोंमपाची ६२२ कोटींची विक्रमी मालमत्ता कर वसुली

कडोंमपाची ६२२ कोटींची विक्रमी मालमत्ता कर वसुली
कडोंमपाची ६२२ कोटींची विक्रमी मालमत्ता कर वसुली फोटो: ठाणे वैभव
कल्याण : मालमत्ता कर हे महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने मार्च-२०२४ अखेर मालमत्ता कराची रक्कम रु.६२२.०७ कोटी इंटर्नल रिसिप्टसह व पाणीपट्टीची रक्कम रू.७४.७२ कोटी इंटर्नल रिसिप्टसह इतकी विक्रमी वसूली केली. महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या कणखर व कुशल नेतृत्वाखाली, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या अधिनस्त सर्व सहा. आयुक्त व प्रभागातील कर विभागाच्या कर्मचा-यांनी अथकपणे व नेटाने कर वसूलीचे काम केल्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत ही विक्रमी कर वसूली झाली आहे. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातही करदात्यांनी या वर्षीच्या प्रारंभापासून शक्यतो ऑनलाईन सुविधेव्दारे कराचा भरणा करुन महापालिकेस यापुढेही असेच सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600