जिल्हा
हात प्रत्यारोपण करणारे ज्युपिटर ठरले जिल्ह्यातील पहिले रुग्णालय
हात प्रत्यारोपण करणारे ज्युपिटर ठरले जिल्ह्यातील पहिले रुग्णालय
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आता हाताचेही प्रत्यारोपण होणार असून त्याचा विभाग सुरू करण्याची घोषणा प्रशासनाने नुकतीच केली आहे. यामुळे हाताला गंभीर दुखापत आणि अवयवाच्या हानीने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक आशादायी आणि परिवर्तनशील उपाय उपलब्ध झाला आहे.
ज्युपिटर हॉस्पिटलने हाताच्या प्रत्यारोपणासाठी आवश्यक कौशल्य असलेले जगप्रसिद्ध सर्जन्स, प्रत्यारोपण तज्ज्ञ, रिहॅब तज्ज्ञ आणि बहुविद्याशाखीय (मल्टी-डिसिप्लिनरी) तज्ज्ञ यांची एक प्रतिष्ठित टीम एकत्र आणली आहे.
या टीमचे नेतृत्व डॉ. वेंकटेरन एन करत आहेत, जे गेल्या वर्षी मुंबईतील एका आघाडीच्या सरकारी रुग्णालयात ज्या टीमने पहिल्यांदा हात प्रत्यारोपण केले तिचा ते एक भाग होते. प्रख्यात प्लॅस्टिक सर्जन आणि ज्युपिटर वुंड केअर क्लिनिकचे सह-संचालक असलेल्या डॉ. वेंकटेश्वरन यांना गुंतागुंतीच्या पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियांचा प्रदीर्घ अनुभव आणि विशेष कौशल्य आहे. ते हँड ट्रान्सप्लांट कमिटी-रोट्टोचे सह-अध्यक्ष देखील आहेत.
हात प्रत्यारोपणे करण्यासाठी अधिक रुग्णालयांची गरज अधोरेखित करताना, डॉ. वेंकटेश्वरन म्हणतात, भारतात एखादा अवयव नसलेल्या अपंगांची संख्या लक्षणीय आहे, अंदाजानुसार अर्ध दशलक्षाहून अधिक लोक गमावलेल्या अवयवासह जीवन जगत आहेत. याव्यतिरिक्त, भारतातील अशा अपंगांची लोकसंख्या दरवर्षी वाढत आहे आणि हजारो नवीन लोकांच्या केसेसची त्यात भर पडत आहे. अपघात, जखम, जन्मजात परिस्थिती आणि आजार यांसह विविध घटक यासाठी कारणीभूत असू शकतात.
हात प्रत्यारोपण विभाग हा अत्याधुनिक सुविधा आणि शस्त्रक्रिया तंत्रातील व्यावसायिकांच्या टीमने हात प्रत्यारोपणाचे व्यापक प्रशिक्षण घेतले आहे आणि या प्रक्रियेशी संबंधित क्लिष्ट मानसिक आणि शारीरिक घटकांची त्यांना सखोल माहिती आहे.
ज्युपिटर हॉस्पिटल शहरात यशस्वीरित्या प्रौढ आणि बाल (पेडट्रिक) प्रत्यारोपण कार्यक्रम राबवत असून, आजपर्यंत 600 हून अधिक प्रत्यारोपणे केली आहेत. ज्युपिटर हॉस्पिटल हे ठाणे जिल्ह्यातील एकमेव केंद्र आहे जे गुंतागुंतीच्या किंवा दुर्मिळ शेवटच्या टप्प्यातील विकारांवर उपचार म्हणून हृदय, यकृत, मूत्रपिंड, बोन मॅरो आणि कॉर्निआजचे प्रत्यारोपण करते. या बहु-विद्याशाखीय (मल्टी- डिसिप्लिनरी) टीममध्ये प्रत्यारोपण सर्जन्स, इन्टेन्सिव्हिस्ट, नेस्थेसिओलॉजिस्ट्स, इसम्युनोलॉजिस्ट्स, मानसोपचार तज्ज्ञ (सायकीट्रिस्ट्स), वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आणि समर्पित नर्सिंग कर्मचारी समाविष्ट आहेत. हा विशेष हात प्रत्यारोपण विभाग सुरू झाल्याने ज्युपिटर हॉस्पिटल्सचे अत्याधुनिक वैद्यकीय प्रक्रियांच्या क्षेत्रातील नेतृत्व अधिक बळकट होणार आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475