जिल्हा

पत्रकारांनी वाहनांवर एचएसआरपी बसवून दिला शिस्तीचा संदेश

पत्रकारांनी वाहनांवर एचएसआरपी बसवून दिला शिस्तीचा संदेश
पत्रकारांनी वाहनांवर एचएसआरपी बसवून दिला शिस्तीचा संदेश फोटो: ठाणे वैभव
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम ठाणे: ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने वाहतूक नियमांचे पालन करत, सुमारे ९० पत्रकारांनी वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट बसवून, स्तुत्य उपक्रम राबवला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नव्या अधिनियमांनुसार सर्व वाहनांवर एचएसआरपी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पत्रकार संघाने पुढाकार घेत समाजापुढे एक अनुकरणीय उदाहरण ठेवले. देशातील सर्व वाहने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्याचे अनिवार्य केले आहे. त्यामुळे मार्च २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना नवीन नंबरप्लेट बसवण्यासाठी ३० जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने नवीन नंबर प्लेट बसवण्याच्या उपक्रमात संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, कार्याध्यक्ष विकास काटे, सचिव निलेश पानमंद, मनोज सिंग आणि कार्यकारिणी सदस्यांनी आणि पत्रकारांनी मिळून सुमारे ९० वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट्स बसवून वाहतूक शिस्तीचा आदर्श घालून दिला. संघाच्या सहकार्याने व एकसंघ प्रयत्नांतून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमाचे पत्रकार बांधवांनी स्वागत करत संघाचे आभार मानले. वाहतूक नियमांचे पालन केवळ गरज नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे मत अनेक पत्रकारांनी यावेळी व्यक्त केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475