जिल्हा

जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट!

जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट!
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! फोटो: ठाणे वैभव
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, या दोन नेत्यांच्या भेटीची चर्चा मात्र सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या आधी गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळीही या दोन नेत्यांमध्ये जवळपास १५ मिनिटे चर्चा झाली होती. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या दोघांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप अस्पष्ट आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा आले आहे. मात्र, अद्याप मुख्यमंत्रीपदाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्याचा कारभार सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच पाहत आहेत. अशा परिस्थितीत जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काल अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475