महाराष्ट्र

नवी मुंबई भाजपतर्फे जितेंद्र आव्हाड यांचा निषेध

नवी मुंबई भाजपतर्फे जितेंद्र आव्हाड यांचा निषेध
नवी मुंबई भाजपतर्फे जितेंद्र आव्हाड यांचा निषेध फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : एखादी न घडलेली असत्य गोष्ट राजकीय सोयीसाठी निर्माण करणे आणि त्याचा प्रसिद्धीसाठी वापर करणे ही जितेंद्र आव्हाड यांची जुनी सवय आहे. त्यामुळे आव्हाड यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचे छायाचित्र नुसते फाडले नसून तो महामानवाचा अपमान आहे. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, असे वक्तव्य नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आराेप करीत गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्यावतीने आव्हाड यांच्या प्रतिमेला जाेडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली. मनुस्मृतीच्या मुद्यावरुन आव्हाड यांच्याकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आराेप यावेळी करण्यात आला. यावेळी माजी महापौर सागर नाईक, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांसह मोठ्या संखेने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475