जिल्हा

रिक्षात विसरलेले १५ तोळ्यांचे दागिने महिलेला परत

रिक्षात विसरलेले १५ तोळ्यांचे दागिने महिलेला परत
रिक्षात विसरलेले १५ तोळ्यांचे दागिने महिलेला परत फोटो: ठाणे वैभव
ठाणे : पोलिसांच्या तत्परतेमुळे एका महिलेचे १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने सुरक्षितपणे परत मिळाले आहेत. वसंत विहार ते नौपाडा, ठाणे या प्रवासादरम्यान महिलेची दागिन्यांची बॅग रिक्षात राहिली होती. घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील सीसी टिव्ही फूटेज तपासून रिक्षाचा शोध घेतला. शिताफीने केलेल्या तपासानंतर पोलिसांनी संबंधित रिक्षा शोधून काढली आणि त्यामधील १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने हस्तगत करून महिलेच्या सुपूर्द केले. नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वृद्धिंगत करणारी ही नौपाडा पोलिसांची कामगिरी प्रशंसनीय असल्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475