जिल्हा

आयटीआयच्या विद्यार्थ्याचा ट्रेनमधून पडून मृत्यू

आयटीआयच्या विद्यार्थ्याचा ट्रेनमधून पडून मृत्यू
आयटीआयच्या विद्यार्थ्याचा ट्रेनमधून पडून मृत्यू फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली: डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकादरम्यान आयटीआयच्या विद्यार्थ्याचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आयुष दोषी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आयुष हा आयटीआयचा विद्यार्थी होता. आयुषच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा पुढील तपास डोंबिवली जीआरपी पोलिसांनी सुरू केला आहे. 20 वर्षीय आयुष हा आपल्या कुटुंबासह डोंबिवली पश्चिम सम्राट चौक येथे राहत होता. मुलुंड येथे आयुष हा आयटीआय शिकत होता. आज आयुषने नेहमीप्रमाणे सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने जाणारी 8 वाजून 15 मिनिटांची फास्ट लोकल पकडली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. गर्दीमुळे लोकलमध्ये आत शिरण्यास जागाच मिळाली नसल्याने तो दरवाजावर उभा होता. मात्र याचदरम्यान त्याचा तोल गेल्याने लोकलमधून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475