महाराष्ट्र

रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा

रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा
रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा फोटो: ठाणे वैभव
अनुदानाचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन ठाणे : घराच्या छपरावर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर’ मोफत वीज योजनेत ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘महावितरण’च्या भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले. ‘रूफ टॉप सोलर सिस्टिम’साठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळते. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफटॉप सोलर सिस्टिम बसवली असली तरीही अधिकाधिक एकूण अनुदान प्रती ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे. वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणा-या या योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महावितरण’ला केली आहे. एक किलोवॅट क्षमतेच्या ‘रूफ टॉप सोलर सिस्टिम’मधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणा-या कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर करणा-या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते, अशी माहिती श्री. काकडे यांनी दिली. घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊजेर्चा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते व जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते. महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर आॅनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. ‘पीएम सूर्यघर’ या नावाचे मोबाईल अ‍ॅपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केलेली असून राज्यातील ग्राहकांनी योजनेचा लवकरात लवकर ला•ा घ्यावा, असे आवाहन ‘महावितरण’नी केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475