महाराष्ट्र

जिल्ह्यातील ५८ पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व

जिल्ह्यातील ५८ पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व
जिल्ह्यातील ५८ पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व फोटो: ठाणे वैभव
ठाणे जिल्ह्यात CAA कायद्याची अंमलबजावणी ठाणे : मोदी सरकारनं 2021 साली सीएए कायद्याला मंजूर दिली होती. हा कायदा प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात लागू झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानातून आलेल्या ५८ पीडित सिंधी बांधवांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, अखंड भारताच्या फाळणीनंतरही पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदूंवर विविध प्रकारे अत्याचार होत आहेत. हा त्रास असह्य झाल्याने गेल्या १५ वर्षांत भारतात आलेल्या ५८ सिंधी नागरिकांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्यान्वये भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. उल्हासनगर शहरातील सिंधी भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 58 सिंधी बांधवानी आता आमचा धर्म भारत मातेच्या कुशीत सुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमी, सिंधी कलाकार संगम, उल्हासनगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानानं विभाजन विभाषिका स्मृती दिवसाचं औचित्य साधून सिंधी भवनात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान देशाचे नागरिकत्व मिळालेल्या नागरिकांनी पाकिस्तानात असताना त्यांच्यावर झालेल्या अन्याय, अत्याचाराच्या व्यथा उपस्थितांसमोर मांडल्या. पाकिस्तानमध्ये त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांचा व्यवसाय, धर्म सुरक्षित ठेवणं त्यांना कठीण होतं. आता हिंदू म्हणून त्यांना भारतात सुरक्षित वाटतंय, असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदानंद सप्रे यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी अखंड भारत ह्या संकल्पनेवर प्रकाश टाकत त्यांचं मत देखील मांडलं. इस्रायल देशाचं उदाहरण देताना ते म्हणाले, "हिंदूंनी महत्त्वाकांक्षी राहावं. पुन्हा एकदा पाकिस्तान व्याप्त सिंध प्रांतात हिंदूंची घरं असतील." यावेळी महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमीचे अध्यक्ष महेश सुखरामानी, पालिका आयुक्त अजिज शेख, अतिरीक्त आयुक्त किशोर गवस, लाल पंजाबी, राजेश वधाऱ्या, राजू जग्यासी, विनोद तलरेजा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राध्यापिका प्रिया वाच्छानी, सीमा मेघानी यांच्या प्रयत्नातून सिंधी भवनात तळ मजल्यावर प्रदर्शनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475