जिल्हा

नवी मुंबईत डेंग्यू संशयित रुग्णांत वाढ

नवी मुंबईत डेंग्यू संशयित रुग्णांत वाढ
नवी मुंबईत डेंग्यू संशयित रुग्णांत वाढ फोटो: ठाणे वैभव
जानेवारी ते आतापर्यंत डेंग्युचे २८८ संशयित रुग्ण नवी मुंबई: बदलत्या वातावरणामुळे नवी मुंबई शहरात साथीचे आजार बळावत आहेत. नागरिकांना ताप, सर्दी, खोकला यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्याचसोबत डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो या आजारांनी देखील डोके वर काढले आहे. डेंग्यू आजार बळावला असून जुलैच्या पहिल्याच आठवड्यात २३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर जानेवारीपासून आतापर्यंत शहरात एकूण २८८ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील दोन जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे. मागील वर्षी खासगी बांधकाम कंपनी, तुर्भे, गावठाण, झोपडपट्टी विभाग, सिडको वसाहतीतील घरे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्या डासांची पैदास आढळली होती. यावर्षी ही हवामानात होणाऱ्या बदलामुळे नवी मुंबई शहरात सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. सध्या आजारांवर खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साथीच्या रुग्णांची संख्या वाढ होत चालली आहे. जून २०२२ मध्ये शहरात डेंग्यूचे ४६ संशयित रुग्ण होते. जून २०२३ मध्ये ६५ संशयित रुग्ण आढळले असून दोन जणांचे निदान झाले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात २३ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी २०२३ ते जुलै २०२३ (पहिल्या आठवड्यापर्यंत) अशा सात महिन्यात एकूण २८८ संशयित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल गॅस्ट्रोच्या रुग्णांत देखील वाढ होताना दिसत आहे. जानेवारी ते जुलैपर्यंत १०१ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून मागील वर्षीपेक्षा अधिक वाढ होताना दिसत आहे. मागील वर्षी जूनमध्ये गॅस्ट्रोचे तीन तर यंदा २३ तसेच मागील वर्षी जुलैमध्ये दोन तर यंदा पहिल्याच आठवड्यात सात रुग्ण आढळले आहेत. त्या तुलनेत मलेरिया आजार नियंत्रणात असून जानेवारीपासून आतापर्यंत १४ रुग्ण असून जुलैमध्ये चार रुग्ण आहेत, अशी माहिती मनपा आरोग्य विभागाने दिली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475