जिल्हा
ठाणे भारत सहकारी बँकेच्या कासारवडवली शाखेचे उद्घाटन
ठाणे भारत सहकारी बँकेच्या कासारवडवली शाखेचे उद्घाटन
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे भारत सहकारी बँकेच्या कासारवडवली, ठाणे येथील शाखेचे उद्घाटन बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी बँकेचे विद्यमान अध्यक्ष मिलिन्द गोखले यांच्या हस्ते झाले. या शाखेच्या एटीएमचे उद्घाटन बँकेचे उपाध्यक्ष किरण वैद्य यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना बँकेचे विद्यमान अध्यक्ष मिलिन्द गोखले यांनी सांगितले की, ठाणे भारत सहकारी बैंक ही आर्थिकदृष्ट्या सक्षम बँक असून, नाविन्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. बँक आपल्या ग्राहकांना त्वरित व तत्पर सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याचबरोबर या विभागातील नागरिकांनी व हितचिंतकांनी बँकेत नवीन खाती सुरु करून बँकेबरोबर बँकींग करून आपलीही आर्थिक प्रगती करण्याचे आवाहन केले.
३० व ३१ जानेवारी २०२६ रोजी खोपोली येथे झालेल्या सहकारी सीएक्सओ १०० शिखर परिषदेत बँकेला इंटरनेट बँकिंगच्या श्रेणीत "आयकॉनिक लीडर २०२५" हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आज मितीस बँकेच्या ३१ शाखा कार्यरत असून, एकूण व्यवसाय २३०० कोटी रुपये इतका आहे. लवकरच आपली बैंक सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पेजावर यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475