जिल्हा

उल्हासनगरात नवरदेवाच्या गाडीने ११ वऱ्हाड्यांना उडवले

उल्हासनगरात नवरदेवाच्या गाडीने ११ वऱ्हाड्यांना उडवले
उल्हासनगरात नवरदेवाच्या गाडीने ११ वऱ्हाड्यांना उडवले फोटो: ठाणे वैभव
तिघांची प्रकृती गंभीर उल्हासनगर: बोहल्यावर चढलेल्या नवरदेवाच्या गाडीने लग्न समारंभात नाचणाऱ्या ११ वऱ्हाड्यांना उडवल्याची खळबळजनक घटना आज रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तीन जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उल्हासनगरातील शांती नगरात रोहित तेजवानी यांचे लग्न पार पडले. वऱ्हाडी नाचू लागले. नवरदेव गाडीत बसला, पण ड्रायव्हरने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याने गाडी सुरू झाली. या गाडीने ११ जणांना उडवले. ही घटना समजताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ११ जणांपैकी आठ जण किरकोळ जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना मीरा या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475