जिल्हा

पोटनिवडणुकीत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी - शिंदे

पोटनिवडणुकीत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी - शिंदे
पोटनिवडणुकीत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी - शिंदे फोटो: ठाणे वैभव
ठाणे : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.
ठाणे येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना याच भावनेतून सर्व पक्षांनी सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केले. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) बारामती पोटनिवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस महायुतीच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत दिल्लीतील नेत्यांची देखील परवानगी मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बारामतीमधून काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
एकीकडे काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले असताना दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475