महाराष्ट्र

पुण्यात रस्त्याला भगदाड, अख्खा ट्रक गेला खड्ड्यात

पुण्यात रस्त्याला भगदाड, अख्खा ट्रक गेला खड्ड्यात
पुण्यात रस्त्याला भगदाड, अख्खा ट्रक गेला खड्ड्यात फोटो: ठाणे वैभव
पुणे : शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडामध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दोन दुचाकी ४० फुट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनास्थळी अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट ऑफिसच्या आवारात चार वाजण्याच्या सुमारास पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचा ट्रक ड्रेनेज लाईन सफाई करण्यासाठी आला होता. त्यावेळी चालकाने ड्रेनेज लाईनपासून काही अंतर ट्रक पुढे घेऊन पुन्हा मागे घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात जागेवरच भले मोठे भगदाड पडले. त्यामुळे जवळपास ४० फुट खोल खड्ड्यात ट्रक पडला आणि बाजूच्या दोन दुचाकी देखील खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या. ट्रक खाली जात असल्याचे लक्षात येताच, चालकाने बाहेर उडी मारून जीव वाचविला. क्रेनच्या मदतीने ट्रक आणि दुचाकी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475