जिल्हा
नेरूळमध्ये शाळेतील छताचे प्लास्टर पडून शिक्षिका जखमी
नेरूळमध्ये शाळेतील छताचे प्लास्टर पडून शिक्षिका जखमी
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नेरूळ सेक्टर ३०, भूखंड क्रमांक ८अ येथील नव्याने बांधलेल्या शाळेत एक वर्गात छताचे प्लास्टर पडल्याची घटना घडली आहे. शाळा सुरू होऊन अवघ्या चौथ्या दिवशीच ही घटना घडल्याने इमारतीचे सदोष बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उपशहर प्रमुख समीर बागवान यांनी केली आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने नेरुळ सेक्टर ३० मधील भूखंड क्रमांक ८अ वर सुमारे १७.७५ कोटी खर्चुन नव्याने शाळा उभारण्यात आलेली आहे. शाळेची इमारत ही प्राथमिकदृष्ट्या निकृष्ट दर्जाचे बांधकाम सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक दिसून येत आहे. १६ जून रोजी शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाले आणि शाळा सुरु झाल्यापासून केवळ चौथ्याच दिवशी म्हणजे. १९ जून २०२५ रोजी इयत्ता ६वी 'क' चा वर्ग सुरु असताना अचानक त्या वर्गातील छताच्या प्लास्टरचे दोन मोठे भाग खाली कोसळले. यावेळी वर्गात ३६ विद्यार्थी उपस्थित होते. वर्ग शिक्षिकेच्या डोक्यावर या स्लॅबचा काही भाग पडल्यामुळे त्यांच्या डोक्यावर किरकोळ दुखापत झाली.
या धक्कादायक घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आणि मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सदर इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपशहर प्रमुख समीर बागवान यांनी केली आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475