जिल्हा

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' उपक्रमात पारिवली जि. प. शाळा अव्वल

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' उपक्रमात पारिवली जि. प. शाळा अव्वल
'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' उपक्रमात पारिवली जि. प. शाळा अव्वल फोटो: ठाणे वैभव
कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या राज्यस्तरीय उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारिवली या शाळेने उत्कृष्ट कामगिरी करत भिवंडी तालुक्यात अव्वल स्थान मिळवले आहे. या यशामुळे पारिवली गावासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. या उपक्रमांतर्गत शाळेच्या इमारतीचे सौंदर्यीकरण, स्वच्छ व सुरक्षित वर्गखोल्या, आकर्षक भिंतीलेखन, शैक्षणिक साहित्याची मांडणी, ग्रंथालय व्यवस्था, स्वच्छतागृहांची सुधारणा, वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागातून राबवण्यात आलेले विविध उपक्रम प्रभावीपणे पूर्ण करण्यात आले. शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर व विद्यार्थ्यांसाठी आनंददायी बनवण्यात आला आहे. या यशामागे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय असवले, विस्तार अधिकारी वैशाली डोंगरे यांचे मार्गदर्शन शाळेतील मुख्याध्यापक पांडुरंग भोईर, शिक्षकवृंद सुरेश पांगारे, वंदना कोळी व अश्विनी पुरी, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरखनाथ लसणे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रकाश लसणे, मित्र परिवाराचेही मार्गदर्शन लाभले. पालक आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळा देखील गुणवत्तापूर्ण व आदर्श ठरू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल जि. प. शाळा पारिवली येथील संपूर्ण शालेय परिवाराचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475