जिल्हा

अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राडा

अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राडा
अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राडा फोटो: ठाणे वैभव
* भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने हल्ला * शिवसेना उमेदवाराने आरोप फेटाळले अंबरनाथ : येथील भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने जीवघेणा हल्ल्याचा प्रकार घडला आहे. शिवसेना उमेदवाराच्या विरोधात प्रचार करत असल्याच्या रागातून शिंदेंसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजप उमेदवार आणि त्याच्या भावाने केला आहे. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्र.५ मधून भाजपचे उमेदवार प्रजेश तेलंगे हे निवडणूक लढवत आहेत. बुधवारी सायंकाळी तेलंगे यांचे भाऊ सत्यम तेलंगे याला त्याच्या ओळखीचा साहिल वडनेरे याने फोन करून इमारतीखाली बोलावले होते. यावेळी चर्चा करत असतांना तू शैलेश दादा विरोधात प्रचार करू नको नाही तर तुला मारून टाकू अशी धमकी देत आरोपी साहिल वडनेरे याने कोयत्याने हल्ला केला. यावेळी सत्यम याने हात पुढे करून वार चुकवला असता हाताला व पाठीवर गंभीर वार झाले असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात आरोपी साहिल वडनेरे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाग ५ मधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शैलेश भोईर, भाजपचे उमेदवार प्रजेश तेलंगे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ब्रिजलाल जैस्वाल हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हल्ला करणारा आरोपी वडनेरे हा शिवसेनेचे उमेदवार शैलेश भोईर यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजपचे उमेदवार प्रजेश तेलंगे आणि त्यांचा भाऊ सत्यम तेलंगे यांनी केला आहे. दरम्यान हल्ला करणारा आरोपी शिवसेनेचा कार्यकर्ता नाही, जाणूनबुजून विरोधक खोटे आरोप करत असल्याचे सांगून शिवसेनेचे उमेदवार शैलेश भोईर यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475