जिल्हा
ठाण्यात पाचव्या दिवशी ८९८४ गणेश मूर्तींचे विसर्जन
ठाण्यात पाचव्या दिवशी ८९८४ गणेश मूर्तींचे विसर्जन
फोटो: ठाणे वैभव
सहा टनाहून अधिक निर्माल्य जमा
ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील पाचव्या दिवसाच्या ८९८४ गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी भक्तीमय वातावरणात झाले. यातील ४८११ मूर्ती शाडू मातीच्या तर, ४१७३ मूर्ती पीओपीच्या होत्या. महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २५ गणेश मूर्तींचे तसेच, फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील ६२ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
यावर्षी निर्माल्यापासून बायो कंपोस्टिंग पद्धतीने खत करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या खत प्रकल्पात निर्माल्य जमा करण्यात आले. कोलशेत, कौसा, ऋतू पार्क येथे हे बायोकंपोस्टिंग प्रकल्प कार्यान्वित आहेत. पाचव्या दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे सहा टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच, निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475