जिल्हा
बेकायदेशीर कफ सिरप विक्री करणाऱ्यांना अटक
बेकायदेशीर कफ सिरप विक्री करणाऱ्यांना अटक
फोटो: ठाणे वैभव
३१८ बाटल्या जप्त
ठाणे: बेकायदेशीर कफ सिरप विक्री करणाऱ्या भिवंडीमधील मुदब्बीर गुलाम अहमद रईस (४४) याला ठाणे शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ६३,२८२ रुपये किमतीच्या ३१८ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्यासह पसार असलेल्या जिब्रान दिवकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून मुदब्बीर याने या बाटल्या खरेदी केल्याचे तपास पुढे आले आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट रस्ता क्र. २१ येथील बुश अँड बिअर कंपनी रिक्षा स्टॅण्ड येथे मुदब्बीर रईस नावाचा व्यक्ती कोडीनयुक्त कफ सिरपच्या बाटल्या बेकायदेशीररित्या विक्रीकरिता १६ ऑक्टोबर रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस शिपाई निलेश शेडगे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील यांच्या पथकाने सापळा रचून मुदब्बीर याला ताब्यात घेत अंगझडती घेतली. त्याच्याकडून ३१८ बॉटल्स मिळून आल्या. त्याच्याकडे कफ सिरप बाटल्या विक्रीबाबत परवाना आहे का? तसेच त्या बाटल्यांचे बिल आहे का? अशी विचारणा केल्यावर त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्या बाटल्या नशा करण्याकरिता विक्री करण्यासाठी आणल्याचे तपासात समोर आले.
याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरीष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475