जिल्हा

नागरिकांची तक्रार येताच हटणार बेकायदा बॅनर

नागरिकांची तक्रार येताच हटणार बेकायदा बॅनर
नागरिकांची तक्रार येताच हटणार बेकायदा बॅनर फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: शहरात चौकाचौकात दिसणाऱ्या बेकायदा बॅनरबाजीला आळा बसावा यासाठी नागरिकांनी तक्रारी करण्याचे आवाहन अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने केल्याने बेकायदा बॅनरबाजीला चाप बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून बॅनरबाजीचे प्रकार वाढले असून त्यामुळे शहर विद्रुपीकरणही होते आहे. राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी बॅनर लावण्यात आघाडीवर आहेत. परवानगीशिवाय लावल्या जाणाऱ्या या बॅनरवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना बेकायदा बॅनरची 0251/ 2682353 आणि 7798114123 या दूरध्वनीवर क्रमांकावर बेकायदा होर्डिंग्ज, बॅनर यांचे छायाचित्र काढून पत्त्यासोबत पाठवता येणार आहे. याबाबत नगरपालिकेने वृत्तपत्रात जाहिरात देऊन जाहीर सूचना प्रसारीत केली आहे. याबाबत नागरिकांना आवाहन केले होते. उच्च न्यायालयाचा दाखला देत अनधिकृत होर्डींग, बॅनर आणि जाहिरात फलकाबाबत जागरूकता आणि दक्षता घेण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त तक्रारी देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. बॅनरवर झालेल्या कारवाईबाबत तक्रादाराला माहिती दिली जाणार आहे, असेही प्रशासनतर्फे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475