महाराष्ट्र

लिफ्टमध्ये हायड्रोजनने भरलेल्या फुग्यांचा स्फोट

लिफ्टमध्ये हायड्रोजनने भरलेल्या फुग्यांचा स्फोट
लिफ्टमध्ये हायड्रोजनने भरलेल्या फुग्यांचा स्फोट फोटो: ठाणे वैभव
मुंबई: मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागात धक्कादायक घटना घडली आहे. अनमोल टॉवर या इमारतीच्या लिफ्टमध्ये अचानक जोरदार स्फोट झाला. वाढदिवसाच्या सजावटीसाठी नेण्यात येत असलेले हायड्रोजन गॅस भरलेले फुगे यास कारणीभूत ठरले. या दुर्घटनेत दोन तरुण आणि एका तरुणीला भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. घटना घडताच काही क्षणांत लिफ्ट आगीच्या ज्वाळांनी भरली. सुदैवाने दरवाजा उघडाच असल्याने तिघांनी तत्काळ बाहेर धाव घेतली आणि मोठा अनर्थ टळला. हा थरारक प्रसंग लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. तज्ज्ञांच्या मते, हायड्रोजनसारखा वायू अतिशय पटकन पेट घेणारा असतो. अगदी छोट्या ठिणगीमुळेही तो भडकू शकतो. त्यामुळे अशा फुग्यांचा वापर करताना विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475