महाराष्ट्र

पावसामुळे कल्याण पूर्वेत घरे कोसळली

पावसामुळे कल्याण पूर्वेत घरे कोसळली
पावसामुळे कल्याण पूर्वेत घरे कोसळली फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण पूर्वतील नेतीवली टेकडीवर सतत पडणाऱ्या पावसामुळे घरे कोसळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरूवारी नेतीवली टेकडी येथील तीन घरे शेजारी असलेल्या दोन घरांवर कोसळली आहेत. चारही घरातील कुटुंब बाहेर असल्याने जीवितहानी टळली. या घटनेत घरांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन दिवसांपूर्वी या परिसराला लागून असलेल्या कचोरे टेकडीवर दरड कोसळल्याची घटना घडली होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास घर कोसळण्याच्या घटनेत सुरेश भोसले यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. घराच्या मागच्या भिंतीला मोठे भगदाड पडले असून घरावरील पत्रे देखील फुटले आहेत. त्यावेळी भोसले कामाला गेले होते. त्यांची पत्नी व मुलगा घरामध्ये होते. त्यांची पत्नी मंगला हिच्या पायास या घटनेत दुखापत झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी पोहचत पाहणी केली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475