महाराष्ट्र

ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांच्या जोर बैठका

ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांच्या जोर बैठका
ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांच्या जोर बैठका फोटो: ठाणे वैभव
ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांची बैठक मंगळवारी सकाळी पार पडली. यावेळी महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी एकजुटीने लढण्याचा आणि पंचेचाळीसहून जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून विद्यमान खासदार यवतमाळच्या भावना गवळी, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, मावळचे श्रीरंग बारणे, पालघरचे राजेंद्र गावित तसेच मुंबईचे राहुल शेवाळे आदीसह अनेक खासदार उपस्थित होते. यावेळी बैठकीत अनेक शंकाकुशंका तसेच दावे-प्रतिदावे आदी संदर्भात बैठकीत विचारविमर्श करण्यात आला. प्रत्येक खासदाराने मतदारसंघांतील कामे व आपल्या दावेदारीचा उहापोह केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा कशा निवडून येतील. या संदर्भात देखील बैठकीत चर्चा झाल्याचे खासदारांनी माध्यमांना सांगितले. भाजपने काही खासदारांना उमेदवारी नाकारली असताना महायुतीमधील घटक पक्षांचा जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर झालेला नाही. त्यात शिवसेनेच्या काही जागांवर भाजपकडून दावा ठोकण्यात आल्याने विद्यमान खासदारांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या काही खासदारांना उमेदवारी नाकारून सक्षम अशा विद्यमान मंत्र्यांना रिंगणात उतरविण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही जागांबाबत जाहीर वक्तव्ये केली जात असल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ माजत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आज शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. या खासदारांकडून मतदारसंघातील सविस्तर माहिती घेऊन विजयाच्या निकषावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी काही जागा भाजपला सोडल्या जाणार असून उमेदवारी मिळणार नाही, असे विरोधकांकडून मतदारसंघात चर्चा सुरु झाल्याने महायुतीबाबत दूषित वातावरण निर्माण होत आहे. त्याचा फटका महायुतीला बसू शकतो, अशी चिंता अनेक खासदारांनी मुख्यमंत्र्याकडे व्यक्त केली. त्यावेळी विद्यमान खासदारांना तिकिटासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्याचबरोबर शिवसेनेला १३ ते १४ जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475