जिल्हा

वाशी एपीएमसी फळ बाजारात कर्नाटकचा हापूस दाखल

वाशी एपीएमसी फळ बाजारात कर्नाटकचा हापूस दाखल
वाशी एपीएमसी फळ बाजारात कर्नाटकचा हापूस दाखल फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी फळ बाजारात आफ्रिकन मलावी हापूस दाखल झाल्यानंतर आता कर्नाटक हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीला एपीएमसी बाजारात कर्नाटक हापूसच्या अनेक जाती विक्रीसाठी उपलब्ध आहेत, ज्यामुळे आंबा प्रेमींना हापूसची लवकर चव चाखायला मिळु लागली आहे. फळ बाजार व्यापाऱ्यांच्या मते, कर्नाटक हापूस आंब्यांची चव, रंग आणि सुगंध ग्राहकांना आकर्षित करतो. लवकर आवक झाली असली तरी, आंबे उच्च दर्जाचे असल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात मागणी वाढली आहे. कर्नाटक हापूससोबत दक्षिणात्य हापूस देखील बाजारात दाखल झाला आहे. सर्वसाधारणपणे एप्रिल-मे महिन्यात खायला मिळणारा हापूस आंबा आता डिसेंबर महिन्यातच मार्केटमध्ये दाखल झाला आहे. फळ बाजारात रोज २ ते ४ टन हापूस दाखल होत आहे. घाऊक बाजारात कर्नाटकी हापूस हा ३५० रुपये किलोने विकला जात आहे तर कमी दर्जाचा कर्नाटकी हापूस हा १०० ते १२० रुपये दराने विकला जात असून उत्तम प्रतीचा हापूस ३५० रुपये दराने विकला जात आहे. कर्नाटकी हापूसप्रमाणेच दाक्षिणात्य हापूस विकला जात असल्याचे व्यापारी किरण जगताप यांनी सांगितले. मुंबई एपीएमसीमधील फळ व्यापारी चिन्मय पानसरे यांनी सांगितले की, हवामान अनुकूल राहिले आणि पुरवठा स्थिर राहिला तर येत्या काळात आंब्याचे दर स्थिर राहतील आणि ग्राहकांना उच्च दर्जाचे हापूस आंबे वाजवी दराने मिळू शकतील.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475