जिल्हा

शास्त्रीनगर येथे शिवसेनेतर्फे हळदी कुंकू समारंभ उत्साहात

शास्त्रीनगर येथे शिवसेनेतर्फे हळदी कुंकू समारंभ उत्साहात
शास्त्रीनगर येथे शिवसेनेतर्फे हळदी कुंकू समारंभ उत्साहात फोटो: ठाणे वैभव
ठाणे: शिवसेनेचे उपशहर प्रमुख स्वप्निल शेडगे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहामधील महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन लक्ष्मीपार्क सर्कलजवळ, शास्त्रीनगर येथे करण्यात आले होते.
यावेळी सुमारे आठ हजार लाडक्या बहिणींनी हळदीकुंकू समारंभाचा लाभ घेतला. समारंभामध्ये प्रत्येक महिलेला हळदीकुंकू वाण म्हणून कुकरचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाबद्दल स्वप्निल शेडगे यांचे महिलांनी कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अनैका सरनाईक यांनी उपस्थिती लावली.
यावेळी माजी नगरसेविका आशा डोंगरे उपशहर प्रमुख जयेंद्र दरेकर, विभाग प्रमुख रामचंद्र गुरव, संतोष ढमाले, दळवी मॅडम तसेच विक्रम बनकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475