जिल्हा

नऊ दुचाकींसह सराईत वाहन चोराला अटक

नऊ दुचाकींसह सराईत वाहन चोराला अटक
नऊ दुचाकींसह सराईत वाहन चोराला अटक फोटो: ठाणे वैभव
साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत कल्याण: खडकपाडा पोलिसांनी वाहन चोरीच्या एका गुन्ह्याचा तपास करत सराईत वाहन चोराला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी असा एकूण सहा लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीच्या अटकेमुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे शहर आणि मुरबाड परिसरातील नऊ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी गांधारी येथील ९० फूट वडवली रोड, महापालिका डम्पिंगजवळून होंडा शाईन मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी अब्बास शाहजोर सय्यद (२५) रा. अटाळी, कल्याण याला अटक करून चोरीची मोटारसायकल हस्तगत केली. पोलीस कोठडीत आरोपीची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या आणखी आठ दुचाकींची माहिती मिळाली. त्यानुसार बर्गमन, ॲक्सेस, एनटॉर्क, अपाची आणि होंडा शाईन या दुचाकींसह एकूण नऊ वाहने जप्त करण्यात आली. या वाहनांची एकूण किंमत सुमारे सहा लाख ३५ हजार रुपये आहे. तपासात आरोपी कापुरबावडी आणि बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या लूट व मालमत्तेसंबंधीच्या तीन गुन्ह्यांतही पाहिजे आरोपी असल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी खडकपाडा, डोंबिवली, कापुरबावडी तसेच मुंबईतील सांताक्रुझसह विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ अतुल झेंडे आणि सहायक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, पोलीस निरीक्षक मारुती आंधळे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600