जिल्हा

ग्रिहीथाने सर केला ९० अंशाच्या कोनातील तैलबैला किल्ला

ग्रिहीथाने सर केला ९० अंशाच्या कोनातील तैलबैला किल्ला
ग्रिहीथाने सर केला ९० अंशाच्या कोनातील तैलबैला किल्ला फोटो: ठाणे वैभव
ठाणे: महाराष्ट्राची हिरकणी आठ वर्षांची ग्रिहिथा विचारे हिने पुन्हा एकदा नवा विक्रम रचला आहे. अत्यंत अवघड आणि कठिण श्रेणीत गणला जाणारा ९० अंशाच्या कोनातील तैलबैला किल्ला सर केला. या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची तब्बल ३३३२ फुट इतकी आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यात येत असला तरी रायगड तालुक्याच्या सीमेवर आणि सुधागड किल्ल्याच्या अगदी समोर आहे. तैल बैला किल्ल्याची उंची साधारण ३०० फुट आहे. तैल बैला किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी लोणावळाहून ३५ किमीचा प्रवास करून तैल बैला या गावात पोहचल्यानंतर एक तासाचा ट्रेक करावा लागतो. तैल बैला प्रस्तरारोहण हा कठीण आणि तांत्रिक श्रेणीत गणला जातो. ९० अंशातील सरळ उभी कठीण चढाई करावी लागते. तैल बैला चढण्यासाठी तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असते. शिखरावर पोहोचण्यासाठी २५०-३०० फूट तांत्रिक चढाई आणि नंतर रॅपलिंग समाविष्ट असते, ज्यासाठी सर्व गिर्यारोहण उपकरणे आणि प्रमाणित अनुभव आवश्यक असतात. तैल बैला सर करून ग्रिहिथाने सर्वात कमी वयात तैल बैला सर करण्याचा नवीन विक्रम आपल्या नावे केला आहे. ग्रिहिथा हिने तिची बहीण हारिता विचारे (१४) आणि वडीलांसोबत ९ एप्रिल २०२३ रोजी यशस्वीपणे तैल बैला सर केला. या मोहिमेसाठी कल्याण येथील सुप्रसिद्ध सह्याद्री रॉक ॲडवेंचर्स टीमचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, सूचित लाड, स्वप्नील भोईर, सुनील कणसे, संजय यांनी तांत्रिक मदत देऊन ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोलाची साथ दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475