जिल्हा

राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची सुवर्ण कामगिरी

राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची सुवर्ण कामगिरी
राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची सुवर्ण कामगिरी फोटो: ठाणे वैभव
सात सुवर्णपदकांसह दोन रौप्य आणि एक कांस्य ठाणे : नुकत्याच झालेल्या ७४ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाच्या ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या धावपटूंनी स्पृहणीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत सात सुवर्णपदकांसह दोन रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवून ठाणे जिल्ह्याने छाप पाडली. पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ठाण्याच्या धावपटूंनी वर्चस्व राखले. या शर्यतीत गिरीक बंगेराने ४७.५५ सेकंद अशा कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. तर ही शर्यत ५३.०३ सेकंदात पूर्ण करणाऱ्या अली शेखला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. साहिल गेदामने १४.५८ सेकंद अशा कामगिरीसह ११० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण पदक आपल्या नावे केले. अभिषेक पाटीलने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत १ तास ५८ मी ४० सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल स्थान मिळवले. महिलांच्या रिले शर्यतीत ठाणे जिल्ह्याच्या संघाने आपला दबदबा राखला. यात आकांक्षा गावडे दोन सुवर्णपदके जिंकली. याशिवाय ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आकांक्षाने कांस्यपदक मिळवले. स्पर्धेतील अन्य पदक विजेते पुरुष-४×४०० रिले-(४:०३:०३ सेकंद)- सुवर्णपदक. महिला : ४×४०० मीटर रिले - सुवर्णपदक (आकांक्षा गावडे, गायत्री शिंदे, लीना धुरी, अर्पिता गावडे) ३:१६:०८ सेकंद, ४×१०० मीटर रिले-सुवर्णपदक ( दियांद्रा, त्रिशा नायर, श्रेष्ठा शेट्टी, आकांक्षा गावडे) ४९.१५ सेकंद. गोळाफेक - अग्रता मेलमुंडे - १०.५३ मीटर,रौप्यपदक. ४०० मीटर धावणे-आकांक्षा गावडे - कांस्यपदक-५७.४३ सेकंद.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600