जिल्हा

१०० मीटर बटरफ्लाय प्रकारात लक्ष्मी सिरापरापूला सुवर्णपदक

१०० मीटर बटरफ्लाय प्रकारात लक्ष्मी सिरापरापूला सुवर्णपदक
१०० मीटर बटरफ्लाय प्रकारात लक्ष्मी सिरापरापूला सुवर्णपदक फोटो: ठाणे वैभव
सब-ज्युनियर नॅशनल अ‍ॅक्वाटिक चॅम्पियनशिप
ठाणे : रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमीची १२ वर्षीय जलतरणपटू लक्ष्मी सिरापरापू हिने जयपूर येथे सुरू असलेल्या ४२ व्या सब-ज्युनियर नॅशनल अ‍ॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी करत इतिहास रचला.
गर्ल्स ग्रुप-३च्या १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १:०८.१२ सेकंदांची वेळ नोंदवत तिने सुवर्णपदक पटकावले आणि नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. लक्ष्मीच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळाले.
डोंबिवली येथील रहिवासी आणि इरा ग्लोबल स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या लक्ष्मीने या राष्ट्रीय स्पर्धेत एकूण चार पदकांची कमाई केली. तिच्या खात्यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. विशेषतः १०० मीटर बटरफ्लायमधील राष्ट्रीय विक्रम ही तिच्या जलतरण कारकिर्दीतील महत्त्वाची कामगिरी ठरली आहे.
लक्ष्मीला ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर, पलावा येथे रुपाली रेपाळे आणि अनिरुद्ध महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण मिळते. आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू, दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या रुपाली रेपाळे यांनी स्थापन केलेली अकॅडमी युवा जलतरणपटूंना घडविण्यासाठी कार्यरत आहे. अकॅडमीचे सह-संस्थापक व प्रशिक्षण प्रमुख अनिरुद्ध महाडिक हे माजी राष्ट्रीय जलतरणपटू आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475