जिल्हा

मीरा-भाईंदर शहरात कचराकुंड्या कोटी-कोटी मोलाच्या

मीरा-भाईंदर शहरात कचराकुंड्या कोटी-कोटी मोलाच्या
मीरा-भाईंदर शहरात कचराकुंड्या कोटी-कोटी मोलाच्या फोटो: ठाणे वैभव
भाईंदर : महानगरपालिका क्षेत्रात मुलभुत सोई सुविधांचा विकासासाठी विशेष तरतुद" योजनेअंतर्गत महापालिका हद्दीत कचरा साठवण पेट्या खरेदी करणेबाबत डस्टबिन खरेदी करणे, सोलार पॅनेल असलेले स्वयंचलित डस्टबिन खरेदी करणे, स्टेनलेस स्टील, पावडर कोटेड ॲल्युमिनियम,डस्टबिन (2) बिन, 3 बिन) खरेदी करणे या निविदेबाबत निविदेतील जास्त दराबाबत प्रसिद्धी माध्यमातून आक्रोश करण्यात आला. या कामाच्या निविदाप्रक्रिया पारदर्शक पध्दतीने व शासनाने विहित केलेल्या नियमावलीनुसार पार पाडण्यात आलेल्या आहेत असे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले. कचरापेट्या शासन निधीतून खरेदी करण्यात येणार असून या कामाकरीता दरसुचीमध्ये दर नसल्याने विहित पध्दतीचा अवलंब करून चालु बाजार भावातील दरानुसार दर निश्चित करून त्यास तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता घेऊन विहित पध्दतीने शासनाच्या वेबसाईटवर www.mahatenders.gov.in वर ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्या निविदेमधून LI निविदाधारक यांचे प्राप्त किमान दर विचारात घेऊन निविदा मंजुरीचा ठराव करण्यात आलेला आहे. परंतु याप्रकरणी कोणताही कार्यादेश कंत्राटदारास देण्यात आलेला नाही. वरील नमुद कामाच्या सर्व प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने व शासनाने विहित केलेल्या नियमावलीनुसार पार पाडण्यात आलेल्या आहेत. तथापि, या निविदेतील दराबाबत पुनश्चः तांत्रिक बाबी तपासुन त्यानंतरच निविदेबाबत निर्णय घेण्याबाबत आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी निर्देश दिले आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475