जिल्हा

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ठामपातर्फे गणेश आरास स्पर्धा

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ठामपातर्फे गणेश आरास स्पर्धा
सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ठामपातर्फे गणेश आरास स्पर्धा फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणशोत्सव आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सार्वजनिक मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्या सार्वजनिक मंडळाला पहिले पारितोषिक १० हजार रुपये, दुसरे पारितोषिक सात हजार ५०० रुपये व तिसरे पारितोषिक सहा ५०० रुपये अशी एकूण आठ बक्षिसे, स्मृतीचिन्हे आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. आरास स्पर्धेबरोबर 'उत्कृष्ट मुर्ती' आणि 'स्वच्छता' यासाठी पारितोषिके देण्यात येतील. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या संस्थांना तसेच गणेशोत्सव मंडळांना अर्जाचे नमुने, माहिती व जनसंपर्क विभाग, महापालिका भवन, पहिला मजला, पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम) येथे सकाळी 11 ते 1.30 व दुपारी 2.30 ते 5या वेळेत मिळतील.अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर 2023 अशी असून ह्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475