जिल्हा

उद्यापासून एमआयडीसी भागात २४ तास पाणी बंद राहणार

उद्यापासून एमआयडीसी भागात  २४ तास पाणी बंद राहणार
उद्यापासून एमआयडीसी भागात २४ तास पाणी बंद राहणार फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: राज्य शासनाच्या पाट बंधारे विभागाने दिलेल्या सुचनेनुसार महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ विभागाच्या बारवी धरणातील पाणी पुरवठा शुक्रवार २६ मे रोजी दुपारी १२ ते शनिवार २७ मे दुपारी १२ वाजेपर्यत असे २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत नवीन जल वाहिन्यांवरील गुरुत्व जल कार्यान्वित करण्याचे तातडीने काम हाती घेण्यात येणार असल्याने एमआयडसीच्या जल वाहिनीवर अवलंबवून असणाऱ्या भागात पाणी पुरवठा होणार नाही. एमआयडीसीच्या बारवी धरणातून पाणीपुरवठा विभागामार्फत ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर,नवी मुंबई, मीरा-भाईंदर तसेच अंबरनाथ, बदलापूर आदी भागात पाणीपुरवठा केला जातो. तर आता वाढते तापमान पाहता राज्यातील धरणांमधील पाण्याचा साठा कमी होत असल्याने आगामी दिवसात पाण्याची निकड पाहता सर्व धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करावे अशा सूचना पाट बंधारे खात्यामार्फत देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शुक्रवार २६ मे दुपारी १२ ते २७ मे २०२३ दुपारी १२ वाजेपर्यत असे २४ तास या एमआयडीसीचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.याच दरम्यान एमआयडीसीने बारवी जल योजनेअंतर्गत टाकलेल्या नवीन जलवाहिन्यांच्या गुरुत्व टाकण्याचे तातडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार शुक्रवार २६ मे दुपारी १२ ते २७ मे २०२३ दुपारी १२ वाजेपर्यंत असे २४ तास या एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, तळोजा, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात शुक्रवार ते शनिवार असा २४ तास पाणी बंद राहणार आहे. त्यानंतर या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. याची संबंधित व्यवसायिकांनी, कंपनी मालकांनी तसेच या भागात राहणाऱ्या रहिवासी नागरीकांनी याची नोंद घेऊन काळजी घ्यावी व पाणी जपुन वापरावे, असे आवाहन महापे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475