जिल्हा

खोट्या नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक

खोट्या नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक
खोट्या नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक फोटो: ठाणे वैभव
ठाणे: गुंतवणूक करणाऱ्याला जास्त मोबदला देण्याचे आमिष दाखवून खेळण्यातील खोट्या नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या भामट्याला कापुरबावडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी भिवंडी येथे राहणाऱ्या संजय कुमार पकौडीलाल भारती (४३) याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून खेळण्यातील नोटा व सोन्यासारखी दिसणारी ३८ बिस्किटे जप्त केली आहेत. भारती याच्या चार साथीदारांची नावे पुढे आली असून त्यांच्या मागावर पोलिस असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत वागळे परिमंडळचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली. भारती याला येत्या ११ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. नितेश शेळके यांना आरोपीने एक लाख रुपये दिल्यास त्या बदल्यात तीन आठवड्यामध्ये तीन लाख रुपये देतो, असे आमिष दाखवले होते. त्याबाबत तक्रारदारांना संशय आल्याने त्यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात धाव घेत, त्याबाबत तक्रार दिली होती. दरम्यान तक्रारदारांना ३ नोव्हेंबर रोजी साकेत बाळकुम रोड येथे त्या इसमाने तो नोटा घेऊन येणार असल्याचे सांगितले. ती माहिती तक्रारदारांनी पोलिसांना दिल्यानंतर तेथे सापळा रचण्यात आला. त्यामध्ये तक्रारदारांना खऱ्या नोटांच्या बदल्यात खेळण्यातल्या नोटा देत असताना, संजयकुमार भारती याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याच दरम्यान त्याच्या साथीदारांनी संधीचा फायदा घेऊन तिथून पळ काढला. भारती याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतल्यावर खेळण्यातील नोटा, सोन्याच्या बिस्किटासारखे बनावट पिवळ्या धातूंची बिस्किटे मिळून आली. यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे प्रत्येकी १०० बंडल असलेले एकूण ३६० बंडल होते. तसेच सोन्यासारखी दिसणारी ३८ पिवळ्या धातूंची बिस्किटे आणि गुन्ह्यातील दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475