जिल्हा

सहाव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून चौघे गंभीर जखमी

सहाव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून चौघे गंभीर जखमी
सहाव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून चौघे गंभीर जखमी फोटो: ठाणे वैभव
कल्याण: कल्याण पश्चिम गांधारी परिसरातील रॉयस गॅलेक्सी इमारतीची लिफ्ट सहाव्या मजल्यावरून कोसळून मोठा अपघात झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले. कल्याण पश्चिमेतील गंधारी परिसरातील रॉयस गॅलेक्सी इमारतीत पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या अंकित मेस्त्री यांच्या घरी गणपती दर्शनासाठी त्यांचे मित्र आले होते. गणपती दर्शनानंतर आठव्या मजल्यावर जेवणाची व्यवस्था असल्याने लिफ्टमधून जात असताना सहाव्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली कोसळली आणि मोठा आवाज झाला. यावेळी लिफ्टमध्ये आठजण होते. आवाजामुळे इमारतीमधील इतर जणांनी धाव घेतली, आणि मदतीला धावले. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले. दोन जणांचे पाय फँक्चर झाले असून खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इमारतीला दोन लिफ्ट आहेत मग नादुरुस्त लिफ्ट चालू ठेवून रहिवाशांच्या जीवाशी खेळ का केला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475